सामाजिक

कोल्हारमध्ये जनसेवा फाउंडेशन आयोजित मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू समारंभात; डॉ.सुजय दादा विखे पाटील व धनश्रीताई विखे यांचा सपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू! 

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

राहाता – जनसेवा फाउंडेशनच्या वतीने कोल्हार (ता. राहाता) येथे मकर संक्रांतीनिमित्त खास महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले डॉ. सुजय दादा विखे पाटील व धनश्री ताई विखे यांचा सपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक,सादर केला यावेळी उपस्थितांना विशेष आनंद मिळाला.

 

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली.डॉ. सुजय विखे पाटील दांपत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!