Uncategorized

पद्मश्री डॉ.विखे पाटील यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षभर विविध कृषि आधारित उपक्रम राबविणार  – डॉ. उत्तमराव कदम 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारंभ संपूर्ण वर्षभर प्रवरा कृषि शास्त्र संस्था विविध नावीन्यपूर्ण कृषि आधारित उपक्रम राबवून साजरी करणार असल्याचे प्रतिपादन प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी केले आहे. 

 

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित शेतकरी दिवस समारंभात डॉ.कदम बोलत होते. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा दिलीप महाले,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश दळे , कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आशिष क्षीरसागर , अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ चंद्रकला सोनवणे,सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

 

शेतकऱ्यांना आज विविध तंत्रज्ञानाची गरज आहे हे तंत्रज्ञान देण्यासाठी प्रवरा कृषी शास्त्र माध्यमातून कृषी शिक्षणाबरोबरच कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक ,प्रयोगशिल शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून थेट बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन पद्मश्री विखे पाटील जयंती पासून सुरु होणार आहे. या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमाचे आयोजन होणार आहे यातून कृषी क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान,नवीन पिकाची माहिती,बाजारपेठ,प्रक्रिया उद्योग आणि विशेषता: ऊस पिकाचे आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे आणि यातून एकरी उत्पादकता कशी वाढावी यासाठी यासाठी विशेष प्रयत्न होणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण गायकर, प्रा.संदीप पठारे, प्रा. शुभम मुसमाडे,कार्यलयीन अधीक्षक किशोर गुळवे आदींनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रमेश जाधव यांनी केले.  

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!