अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

मा.आ. स्नेहलताताई कोल्हेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

महंतांचे आशीर्वाद, गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप, गोशाळेस चारा दान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – महाराष्ट्रासह कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी बांधवांच्या पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. वाढदिवसानिमित्त फलक, होर्डिंग्ज, बॅनर आणि पोस्टरवरील अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या मदतीसाठी तसेच समाजोपयोगी कार्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.वाढदिवसानिमित्त स्नेहलताताई कोल्हे यांनी शिर्डी येथे सद्गुरू साईबाबा, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम आणि आत्मा मालिक ध्यानपीठ येथे भेट दिली. यावेळी गोदाधाम सरला बेटाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज तसेच आत्मा मालिक ज्ञानपीठाचे गुरुमाऊली यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासोबतच आध्यात्मिक परंपरेचेही स्मरण करण्यात आले.कोपरगाव शहरातील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात अनुलोम संस्थेच्या पुढाकारातून मानसकन्या अभियानांतर्गत गरजू विद्यार्थिनींना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक पाठबळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.दुष्काळाची झळ केवळ माणसांनाच नव्हे, तर पशुधनालाही बसत आहे. चाऱ्याची उपलब्धता कमी होत असताना मुक्या जीवांची काळजी घेणे हीदेखील सामाजिक जबाबदारी आहे.हीच भावना लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी या सेवाभावी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या माध्यमातून संत जनार्दन स्वामी आश्रमातील गोशाळेस चारा दान करण्यात आला. यावेळी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!