ऐतिहासिकप्रशासकीययशवंत सामाजिक प्रतिष्ठानसामाजिक

यश अकॅडमी सोनईच्या विद्यार्थ्यांची नवीन संसद भवन व राष्ट्रपती भवनाला भेट लोकशाहीच्या मंदिरात विद्यार्थी झाले नतमस्तक 

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी राहुल राजळे

 

सोनई – भारताच्या नवीन संसद भवन व राष्ट्रपती भवनाला यश अकॅडमी,सोनईच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.हा दौरा विद्यार्थ्यांना भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व व राष्ट्रीय वारसा समजण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांनी भारताचे नवीन संसद भवन पाहण्याचा सन्मान मिळवला, जिथे त्यांनी लोकशाहीचे अधिष्ठान असलेल्या या ऐतिहासिक इमारतीच्या रचनेविषयी सविस्तर माहिती घेतली. या भव्य इमारतीचे स्थापत्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, व परिसरातील ऐतिहासिक संदर्भ याने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. शिवाय संसद भवनाच्या कार्यकारिणी व संचलन प्रक्रिया याबद्दल माहिती घेतली. तसेच परिसरातील म्युझियम ला भेट देऊन भारताच्या समृद्ध वारसा अनुभवला.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली. भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान पाहणे ही विद्यार्थ्यांसाठी अनोखी व प्रेरणादायी संधी होती. तेथे त्यांनी राष्ट्रपतींच्या कार्यपद्धती, सभागृहांचे ऐतिहासिक महत्त्व व सौंदर्य पाहिले. दिल्ली येथील इंडिया गेटला भेट देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण केले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संसदेतील प्रतिनिधींनी व शिक्षकांनी लोकशाही मूल्ये व राष्ट्रीय अभिमान यावर भर देणारे व्याख्यान दिले. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली असून, त्यांना भविष्यात देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली.

मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे ,सहसचिव डॉ.विनायक देशमुख यश अकॅडमीचे प्राचार्य अझहर गोलंदाज यांच्या संकल्पनेतून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले व अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याचे सांगितले.यश अकॅडमीचे विद्यार्थी 6 दिवसांच्या शैक्षणिक सहलीवर असून अग्ऱ्यातील ताजमहाल, आग्रा किल्ला,वृंदावन,लाल किल्ला,कुतुब मिनार,फतेपुर शिखरी अशा अनेक ऐतीहासिक वास्तूंना त्यांनी भेटी दिल्या आहेत.

 

नविन संसद भवनव राष्ट्रपती भवनास अभ्यास दौऱ्यात भेट दिली या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत झाली असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडली आहे.

कु.अभा देवदत्त पालवे विद्यार्थीनी,यश अकॅडमी सोनई.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!