
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील चितळी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा मंचतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी चितळीगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी समस्त विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांनी महामानवाला अभिवादन केले.याप्रसंगी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा मंचच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितळीगाव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.सामाजिक उपक्रमातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या दिशादर्शक उपक्रमाचे सर्वत्र पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंचचे अध्यक्ष विजय पठारे,ग्रामपंचायत सदस्य अजय कुऱ्हाडे,काका वाघ,बबलू पगारे,प्रशांत साबळे,सागर आरणे,सुभाष वाघ, शाळेचे मुख्यध्यापक विश्र्वास टपळे, शिक्षक वृंद विश्वास चोखर,संजय आग्रे,दिपक अहिरे,श्रीमती सुजाता लांबाटे,सचिन विधाते आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यध्यापक विश्वास टपळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंचच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व उपस्थितांचे आभार मानले.
