स्नेहालय संस्था अहिल्यानगर

भविष्यातील चॅम्पियन;स्नेहालय बालभवन हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२४ ची शानदार सुरुवात

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

     अहिल्यानगर-वंचित घटकांतील बालकांच्या सुप्त कौशल्यांना वाव देऊन त्यांना उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी स्नेहालय संचलित बालभवनाने 13 व्या ‘हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२४’ चे आयोजन केले. ‘भविष्यातील चॅम्पियन’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेतून मुलांच्या क्रीडात्मक क्षमतांचा विकास करून त्यांच्यातील संभाव्य ‘रत्नांना’ घडविण्याचा उद्देश साध्य केला गेला.

जिल्हास्तरीय १३ वी स्पर्धा पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात २८ डिसेंबर २०२४ रोजी भव्य स्वरूपात सुरू झाली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या महेश्वरी गावित (प्राचार्य, पेमराज सारडा महाविद्यालय), दिनेश मोरे (अध्यक्ष, युनिव्हर्स फाउंडेशन), गणेश पाटील (सेक्रेटरी, युनिव्हर्स फाउंडेशन), राजीव गुजर (स्नेहालय विश्वस्त), संजय बंदिष्टी (स्नेहालय पालक), वैशाली चोपडा (बालभवन मानस संचालक), हनीफ शेख (अनिवासी विभाग संचालक), व शबाना शेख (सखी नॉन स्टॉप सेंटर) या मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलन आणि फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले.

या दोन दिवसीय स्पर्धेत ३५६ बाल खेळाडूंनी सहभाग घेतला. लहान गटासाठी ६० मीटर धावणे, ५० मीटर बॅटन रिले, आणि मोठ्या गटासाठी १०० मीटर धावणे, १०० मीटर बॅटन रिले, तसेच ओपन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. याशिवाय २९ डिसेंबर रोजी कबड्डी आणि खो-खो या सांघिक खेळांमध्ये मुलांनी जोरदार कामगिरी केली.या स्पर्धेने मुलांना त्यांच्या क्रीडांगणातील कौशल्यांना वाव देण्यासह सहकार्य, आत्मविश्वास, आणि स्पर्धेची भावना यांचे महत्त्व पटवून दिले. विविध खेळांतून त्यांनी जिद्द, चिकाटी आणि संघभावनेचे दर्शन घडवले.

कार्यक्रमाची प्रस्तावना हनीफ शेख यांनी केली, सूत्रसंचालन साजेदा शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली चोपडा यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उषा खोल्लम, प्रतीक्षा साळवे,संतोष बेदरकर, जयश्री शिंदे, रुबीना शेख, वीणा वड्डेपेल्ली, सचिन वाघ, रजिया दफेदार, गुलनाज शेख, अंबादास पोटे, राहुल वैराळ, शिक्षकवृंद व बालभवन स्वंयसेवक यांनी मेहनत घेतली.

 

स्नेहालयाच्या या उपक्रमाने वंचित घटकांतील बालकांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा केला. ‘भविष्यातील चॅम्पियन’ घडवण्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!