अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

विक्रम बिर्याणी हाऊसचे संस्थापक आदित्य तरस व प्रज्वल तरस यांना ‘नवराष्ट्र आयकॉन्स ऑफ अहिल्यानगर २०२६’ पुरस्कार जाहीर

हॉटेल व्यवसायातील उल्लेखनीय वाटचालीची दखल; ४ नोव्हेंबर रोजी प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध ‘विक्रम बिर्याणी हाऊसचे’ संस्थापक आदित्य तरस व प्रज्वल तरस यांना ‘नवराष्ट्र आयकॉन्स ऑफ अहिल्यानगर २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हॉटेल व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या तरस बंधूंच्या कार्याची दखल घेत नवराष्ट्रच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हॉटेल व्यवसायात गुणवत्ता, चव, स्वच्छता आणि ग्राहकांचा विश्वास या बाबींना प्राधान्य देत आदित्य तरस व प्रज्वल तरस यांनी विक्रम बिर्याणी हाऊसच्या माध्यमातून श्रीरामपूरमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बिर्याणीच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे त्यांचा व्यवसाय श्रीरामपूरसह परिसरातील ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे.

स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात स्वतःचा व्यवसाय उभा करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची त्यांची वाटचाल नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या व्यावसायिक यशाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

नवराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘आयकॉन्स ऑफ अहिल्यानगर २०२६’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ‘रत्न पुरस्कार २०२४’ आणि ‘जनसेवक पुरस्कार २०२५’ या सोहळ्यांच्या माध्यमातूनही विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.

बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अहिल्यानगर येथील जाधव लॉन्स, जाधव पेट्रोल पंपाशेजारी, नगर-कल्याण रोड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते आदित्य तरस व प्रज्वल तरस यांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!