महाराष्ट्रराजकीय

काँग्रेसचे प्रकाश पगारे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेला अपमान लोकशाहीला काळिमा फासणारा – सौ. प्रभावती घोगरे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता –काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झटणारे श्री.प्रकाश उर्फ मामा पगारे (वय ७५) यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष व अपमानास्पद कृत्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध नोंदविला आहे.

 

मंगळवारी रुग्णालयात जात असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना फसवून बोलावले. त्यानंतर भर रस्त्यात त्यांच्यावर दमदाटी करण्यात आली, त्यांना साडी परिधान केली. तसेच जातिवाचक वक्तव्ये करून त्यांच्या सन्मानावर गंभीर आघात करण्यात आला.

 

या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे म्हणाल्या “ही घटना फक्त एका व्यक्तीचा अपमान नाही, तर हा प्रहार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानावर, दलित समाजाच्या स्वाभिमानावर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आत्मगौरवावर. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर काळिमा फासणारी ही गुंडगिरी लोकशाहीत कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. ही घटना भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांनाही धक्का देणारी आहे.”

 

या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मा.मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी प्रशासनाकडे संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.सौ. घोगरे पुढे म्हणाल्या “संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने न्याय मिळविण्यासाठी लढा उभारेल. न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथील राहता तालुका पोलीस ठाणे येथे अधिकृत निवेदन देऊन गुंड प्रवृत्तीच्या कृत्याचा तीव्र निषेधही नोंदविण्यात आला.

 

यावेळी ॲड.पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, शिवसेनेचे सचिन कोते, संजय शिंदे, ज्ञानेश्वर वर्पे, उत्तमराव घोरपडे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, अमृत गायके, अमोल आरणे, उत्तमराव मते, संजय डांगे, संजय पगारे, मुन्नाभाई फिटर, रावसाहेब बनसोडे, सौरभ शेळके, मेजर घोरपडे,सचिन(मुन्ना) आहेर, शरद घोगरे, किरण जपे, शरद भदे, साहिल मस्के यांच्यासह महिला प्रतिनिधी सुनीता कोरडे आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

 

विशेष म्हणजे या निषेधात काँग्रेससोबत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले, ज्यामुळे पक्षांची एकजूट स्पष्ट झाली.काँग्रेस पक्षाने न्याय मिळेपर्यंत ठाम भूमिका घेण्याची भूमिका ठरवली असून, सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी व संविधानाचे मूल्य जपण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!