
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी अंतिम वर्ष पदविका अभ्यासक्रमातील चैताली राजेंद्र वाडेकर ८६.३६% हिने प्रथम क्रमांक, कोमल भास्कर गाढे ८६% द्वितीय क्रमांक आणि संस्कृती विलास कोकणे ७९.९१% हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाचा निकाल ९५.५५% लागलेला आहे अशी माहीती डाॅ.रविंद्र जाधव यांनी दिली.
प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमात विद्यार्थिनी वैष्णवी राजू आवारे ७८% हिने प्रथम क्रमांक, प्रगती मच्छिंद्र पवार ७६% द्वितीय क्रमांक तर साक्षी बंडोपंत पोकळे ७४.५०% हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल लागलेला आहे.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, डाॅ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले आहे.
