
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यात बिबट्यांचा दिवसेंदिवस लोकवस्तीत वावर वाढत असून यामुळे वाड्या वस्तीवर वास्तव्य करणारे नागरिक व शेतकरीवर्ग भयभीत झाले आहे.बुधवारी धनगरवाडी-दिघी परिसरातील गोटेवाडी रोड लगत बिबट्या मुक्त संचार करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली तर शेतकरी सुनील कुरकुटे यांना वाकडी-चितळी रोडवर खाणीजवळच्या शेतशिवारात रात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या बिबट्याचे अवघ्या काही अंतरावरच थरारक दर्शन झाले त्यांनी फोरव्हीलर गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश बिबटयावर चमकविला यावेळी बिबटयाने त्यांना आव्हान करत मोठ्याने डरकाळी फोडली त्याच ठिकाणी तटस्थ उभा राहिला अंधाराचा सहारा घेऊन अवघ्या काही क्षणात तिथून गायब झाला त्यांनी ही घटना तात्काळ मोबाईल फोनमधील कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली असून वनविभागाला सुचित केले आहे परिसरात लागोपाठ दोन बिबटे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

चितळी-धनगरवाडी-दिघी- वाकडी भागात गेल्या वर्षभरापासुन सर्वत्र मानवीलोकंवस्तीच्या परिसरात बिबटे वावरताना आढळून येत असल्याने शेतकरी,स्थानिक नागरिक,शालेय विद्यार्थी,शेत मजूर यांनी चिंता व्यक्त केली असून. परिसरातील शेतशिवारात सातत्याने बिबटे दिसणे काही नवीन गोष्ट नाही.परिसरातील शेतकरी व मजूर वर्ग सर्वाधिक भीतीच्या सावटाखाली आहे.

याठिकाणी सलग दोनदा मानवी जीवितहानी झालेली असताना वनविभागाकडून परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे नागरिकांनी माहिती देताना सांगितले.अनेकदा बिबटे भक्षाच्या शोधात पिंजऱ्याजवळ येतात परंतु;अचानक पिंजऱ्याला गुंगारा देत आहेत.याच भागात यापूर्वी वनविभागाला चार बिबट्याना जेरबंद करण्यात यश आलेले असून.राहाता तालुक्यातील चितळी-धनगरवाडी- दिघी-वाकडी येथील परिसरात दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असून ही बाब नागरिकांच्या दृष्टीने हानिकारक मानली जात आहे.
यामुळे परिसरात मोठी दहशत वाढत आहे.कोपरगाव वनविभागाने परिसरात चार ठिकाणी पिंजरे लावले असून यात बिबटे जेरबंद होत नाही भक्ष्याच्या शोधात बिबटे थेट मानवीवस्तीकडे कुच करतात शेळ्या पाळीव कुत्रे आदी प्राण्यांवर हल्ला करतात काही वेळेस नागरिकांवर दबा धरून हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे नागरिक घरातून बाहेर पडण्यास घाबरत असून कोपरगाव वनविभागाने याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनिल कुरकुटे,राऊसाहेब शिरगिरे, रविंद्र शेळके,किरण शेळके ,गणेश येलम,आदींसह परिसरातील सर्व नागरिकांनी केली आहे.




