
(प्रतिनिधी:- अक्षय काळे/ कोपरगाव शहर)
कोपरगाव:- महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या ‘नायलॉन मांजाची’ कोपरगाव शहरात सर्रास विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगून अवैध मांजा विक्री करणाऱ्या इसमाच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बुधवार (ता.१८) रोजी आरोपी मतीन जब्बार मन्यार (वय.३२) याच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेली माहिती अशी की,आरोपी मतीन जब्बार मन्यार (वय.३२) राहणार जुनी मामलेदार कचेरी कोपरगाव, हा इसम कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पशुपक्षी व मानवाच्या जीवास धोका निर्माण करणाऱ्या ‘नायलॉन मांजाची’ सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याबाबत पोलिसांनी आरोपीवर तात्काळ कारवाई केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
घडलेली हकीकत अशी की,पोलिस यंत्रणेला मिळालेल्या माहितीच्या आधारे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ श्रीकांत बाळू कुऱ्हाडे यांनी कुठलाही विलंब न करता कोपरगाव शहराच्या परिसरातील जुनी मामलेदार कचेरी येथे तात्काळ धाव घेतली असताना त्या ठिकाणी आरोपी मतीन मन्यार नामक हा इसम कोपरगाव शहरामध्ये स्थित असलेल्या जुनी मामलेदार कचेरीच्या परिसरामध्ये मांजाची विक्री करण्यासाठी दुकान थाटून अगदी सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे समजले ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर धाडसत्र सुरु झाले.
यावेळी इसमास पोलिसी खाक्या दाखवत कौतुकास्पद कारवाई केली असून केलेल्या कारवाईमध्ये मांजा विक्री करणारा आरोपी मतीन जब्बार मणियार याच्या मुसक्या आवळून योग्य ती कारवाई केली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. श्रीकांत कुऱ्हाडे यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे.यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे.
या प्रकरणी पो.कॉ. श्रीकांत कुऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नोंद क्रमांक ५५९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २२३,१२५ सह पर्यावरण संरक्षण कलमा अंतर्गत १९८६ कलम ५,१५ प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून आरोपीकडून तब्बल आठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजाच्या मोनो असे लिहिलेल्या आठ रीळ पोलिसांच्या धडाकेबाज अशा कारवाईत हस्तगत करण्यात आलेल्या असून घडलेल्या गुन्ह्याबाबत पुढील तपास पो. हेड.कॉ बी.एच तमनर हे करत आहे.
