Warning: Undefined array key "fourth-footer-widget-area_2" in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104

Warning: Trying to access array offset on null in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104
किड्स किंग्डम अकॅडमी चे तालुकास्तरावरील गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये यश! – ahilyanagarkhabarbaat.com
नेवासा तालुका

किड्स किंग्डम अकॅडमी चे तालुकास्तरावरील गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये यश!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी – राहुल राजळे

 

नेवासा -तालुक्यातील राजे संभाजी माध्यमिक विद्यालय कौठा या ठिकाणी पंचायत समिती नेवासा तालुका विज्ञान व गणित अध्यापन संघ आयोजित १५२ वे तालुकास्तरीय विज्ञान,गणित व पर्यावरण प्रदर्शन संपन्न झाले.

या प्रदर्शनात किड्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपले विज्ञान व गणिताचे प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनामध्ये गट १ ली ते ५ वी आदेश घोंडगे या विद्यार्थ्याला गणित या प्रोजेक्टसाठी पहिला क्रमांक मिळाला आहे.६ वी ते ८ वी गटात शिवम हापसे या विद्यार्थ्याला विज्ञान मधील प्रकल्पासाठी द्वितीय क्रमांक मिळाला आहे.तर ९वी ते १२वी च्या वरद जाधव व सर्वेश शेटे व रुद्राक्ष जाधव या विद्यार्थ्यांना गणित विषयात तृतीय क्रमांक मिळाले आहे.

या अध्यापक संघामध्ये शिक्षक प्रकल्प मध्ये गणित शिक्षक दादासाहेब राशीनकर यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे किड्स किंग्डम अकॅडमीच्या मुख्याध्यापिका कीर्ती बंग ,सचिन बंग यांनी अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना विज्ञान व गणिताचे प्रकल्प करण्यासाठी सुशील मोटे,दादासाहेब राशिनकर , सागर हापसे ,गणेश वीर,राणी राऊत,सुरेखा वाकचौरे,काजल कसबे,संगिता कोरडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

 

 

जाहिरात

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!