Warning: Undefined array key "fourth-footer-widget-area_2" in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104

Warning: Trying to access array offset on null in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104
कोपरगाव तालुक्यात स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत बालविवाह मुक्ती मिशन सप्ताह साजरा – ahilyanagarkhabarbaat.com
कोपरगाव तालुकासामाजिकस्नेहालय संस्था अहिल्यानगर

कोपरगाव तालुक्यात स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत बालविवाह मुक्ती मिशन सप्ताह साजरा

पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक यांना बालविवाह प्रतिबंधाविषयी जनजागृती

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

कोपरगाव – स्नेहालय उडान प्रकल्प अंतर्गत कोपरगाव तालुक्यात बालविवाह मुक्ती मिशन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांना बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. माझे गाव बालविवाहमुक्त गाव आणि माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा या उपक्रमांचा तालुक्यात शुभारंभ झाला असून प्रत्येक गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे.

जाहिरात

या मोहिमेअंतर्गत गावोगावी जाऊन ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांना पुढील काळात प्रशिक्षण दिले जाणार आहे.यामध्ये गावसभेत बालविवाहमुक्त गावाचा संकल्प करून हे अभियान राबवले जाणार आहे.तसेच, कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे हक्क आणि मोबाईल, सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

जाहिरात

कोपरगाव तालुक्यातील ऊसतोड कामगार कुटुंबांपर्यंतही या जनजागृतीचा प्रभाव पोहोचवला गेला. ऊसतोड कामगार कुटुंबांमध्ये जाऊन त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.या मोहिमेत डॉ.अशोक गावित्रे, स्नेहालयचे वैभव शेलार, उडान प्रकल्पातील स्वयंसेवक आकाश पंडोरे, गोदामाई प्रतिष्ठानचे प्रज्वल ढाकणे आणि आकाश खंडागळे यांनी विशेष योगदान दिले. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांतर्गत शेकडो विद्यार्थी आणि पालकांपर्यंत बालविवाह प्रतिबंधाचा संदेश पोहोचवून बालविवाहमुक्त कोपरगावच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!