प्रशासकीय

शिर्डी मतदार संघातील रेल्वे संबंधित प्रश्न सोडवीण्यासाठी तात्काळ लक्ष घाला; खा. भाऊसाहेब वाकचौरे यांची रेल्वे विभागीय बैठकीत आग्रही भूमिका

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – शिर्डी मतदार संघातील रेल्वे संबंधित प्रश्न सोडवीण्यासाठी तात्काळ लक्ष घाला अशी मागणी शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुणे येथे झालेल्या रेल्वे विभागीय बैठकीत आग्रही भूमिका घेऊन मंडल रेल्वे प्रबधक व वरिष्ठ अधिकारी यांनी प्रश्नांची सोडवणूक करनेकामी तातडीने भेट द्यावी अशी मागणी करून अधिकाऱ्यानी सदर मागणी मान्य केली.

 

 

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी मतदार संघातील प्रवाशी, शेतकरी, व्यावसायिक यांचे दृष्टीने रेल्वेविभागाच्या उद्भवणाऱ्या आवश्यक बाबी बैठकित मांडल्यात बैठकीस खासदार सुप्रिया ताई सुले, ओंमराजे निंबाळकर,धैर्यशील मोहिते,डॉ शिवाजी काळगे,रजनी पाटील,मेधाताई कुलकर्णी,नीलेश लंके ,डॉमोल कोल्हे,श्रीरंग बारणे, यांचेसह रेल्वेचे महा प्रबधक श्री धर्मवीर मीना ,मंडल रेल्वे प्रबधक राजेशकुमार वर्मा यांचेसह रेल्वे विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

खासदार वाकचौरे यांनी प्रामुख्याने श्रीरामपूर शहरातील रेल्वे विभागातील अतिक्रमणधारकांना नोटीसा, बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानकावरील नवीन मालधक्काबाबत. लाडगाव-पढेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे रेल्वे लाईन हद्दीत अंडरपास बांधण्याबाबत, रेल्वे ओव्हरब्रिजचे रुंदीकरण आणि बस स्टँडसमोरील नवीन भूमिगत रेल्वे पुल. मध्य रेल्वे दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवणे आंचलगाव तालुका, कोपरगाव जिल्हा, अहिल्यानगर या रेल्वे हद्दीत रस्त्याची तरतूद करण्याबाबत. माझ्या मतदारसंघात, आंचलगाव तालुका, कोपरगाव जिल्हा, अहिल्यानगर, रेल्वे पोल क्रमांक ४६७/२९ ते ४६८/२३ या अंतर्गत शेतकऱ्याना तसेच खिरडी गणेश ,संवत्सर येथील लक्ष्मणवाडीमधील शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देणेबाबत, कोरोना काळात बंद केलेल्या सवलती पुन्हा सुरू करण्याबाबत. २०२१ मध्ये, कोरोना साथीच्या आजाराविरुद्ध उपाययोजना म्हणून, रेल्वे विभागाने ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि प्रवाशांच्या सवलती बंद केल्या आहेत त्या पूर्ववत सुरू करणेबाबत , साईनगर (शिर्डी) येथून अहमदनगर अमळनेर रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत. साईनगर शिर्डी येथून साईनगर पुणे (पनवेल) रेल्वे सुरू करणे, साई नगर पुणे दादर एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबद्दल, साईनगर – पुणे हा मार्ग मुंबई सीएसटी पर्यंत वाढवणे,शिर्डी – शनी शिगणापूर रेल्वेमार्ग सर्वेक्षण ,बेलापूर परळी रेल्वे मार्ग सर्वेक्षण पुणे नाशिक रेल्वे मार्ग सर्वेक्षण शिर्डी -शहापूर रेल्वे मार्ग सर्वेक्षण नागरसोल -शिर्डी रेल्वे मार्ग जोडणे शिर्डी ते समृद्धी मार्ग नाशिक पुणे रेल्वे मार्गास जोडणे, अशा अनेक प्रश्नावर लक्ष वेधून या बाबत पत्र व्यवहार, संसदेचे माध्यमातून लक्ष वेधले असल्याचे सांगून माझा मतदार संघ प्रामुख्याने अकोले, शिर्डी,शनि शिगणापुर, नेवासा येथील धार्मिक ठिकाणांमुळे प्रसिद्ध असून येथे येणारे भाविक ,पर्यटक, यांना सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी केली.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे समवेत रेल्वे विभागीय सदस्य राहुल मुथा, रणजीत श्रीगोंड , संवत्सर येथील शेतकरी हे ही उपस्थित होते,

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!