Uncategorized

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी-आश्वी सीमेवर दोन हॉटेल्सवर विशेष पथकाचा छापा २.२२ लाखांची अवैध दारू जप्त,दोन आरोपी अटकेत

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाच्या धडक कारवाईने जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले!

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

अहिल्यानगर – जिल्ह्यातील राहाता-संगमनेर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या लोणी -आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वेगवेगळ्या हॉटेल्सवर विशेष पोलीस पथकाने धाड टाकून २,२२,१७८ रुपयांची देशी-विदेशी अवैध दारू व रोख रक्कम जप्त केली असून २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरून ही कारवाई पार पडली.

 

(दि.२० जून) २०२५ रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष आ. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रथम हसनापूर रोडवरील हॉटेल साईछत्र, लोणी बुद्रुक येथे छापा टाकून सागर प्रकाश पावसे (वय ३४, रा. सोनार गल्ली, लोणी बु.) याला अटक केली. त्याच्याकडून १,४६,४०८ रुपयांची दारू व २०,३८० रुपये रोख, असा एकूण १,६६,७८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

यानंतर दुसरी कारवाई सादतपूर शिवारातील लोणी–संगमनेर रोडवरील हॉटेल साईसागर येथे झाली. येथेही गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून आतिष भाऊसाहेब गायकवाड (वय ४०, रा. विठ्ठलनगर, लोणी बु.) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४२,०९० रुपयांची दारू व १३,३०० रुपये रोख, असा एकूण ५५,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दोन्ही प्रकरणांमध्ये मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये पुढीलप्रमाणे नोंद झाली आहे लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७१/२०२५ व आश्वी पोलीस स्टेशन गु.र.नं. १२०/२०२५.अशी नोंद करण्यात आली.

 

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (श्रीरामपूर विभाग), प्रशांत खैरे (अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) व नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

या विशेष पथकाचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी केले. या पथकात पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोकों सुनिल दिघे, पोकों अमोल कांबळे व पोकों जालिंदर दहिफळे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!