प्रवरा शिक्षण संस्थालोणीशैक्षणिक

प्रवरेच्या सात विद्यार्थ्यांची अग्नी वीर मध्ये निवड;

यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून कौतुक!

 

लोणी – (दि.२५) –लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील सात विद्यार्थ्यांची अग्नीवीर मध्ये निवड झाली आहे अशी माहीती संस्थेचे शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी दिली. 

 

पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यातील अजय संजय दुशिंग, तेजस अशोक खेमनर,, प्रसाद गोरक्षनाथ अदिक, पंकज शिवाजी गायकवाड, वाढवणे शुभम विठ्ठल वाढवणे यांची तर कोल्हार येथील सिद्धार्थ राजेंद्र लोखंडे आणि राहाता येथील अनिल भाऊसाहेब सातपुते यांची अग्निवीर म्हणून इंडियन आर्मी मध्ये निवड झाली आहे.  

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय आणि निम शासकीय सेवेत संधी मिळाव्यात या उद्देशाने संस्थेने प्रवरा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि प्रवरा अभ्यासिका सुरू केल्या. आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक आणि विविध सेवा सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. मोफत संदर्भ पुस्तकांची सुविधा मुलाखतीचे तंत्र या विषयावरती सविस्तर माहिती तज्ञाच्या माध्यमातून या केंद्रातून दिली जाते.संस्थेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयामध्ये प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि पोलिस भरती केंद्र कार्यरत आहे.याचा ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे.

 

आज पर्यंत या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध विद्यार्थी हे शासकीय आणि निम शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्याचे समन्वयक डाॅ. शैलेश कवडे- देशमुख यांनी सांगितले.पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील एन.सी .सी चे प्रमुख कॅप्टन राजेंद्र पवार आणि लेफ्टनंट दशरथ खेमनर यांचे या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा केंदा मुळेच मी यश प्राप्त करू शकलो.आज मी अग्नीवीरमुळे माझे स्वप्न पुर्ण करु शकलो. अशी प्रतिक्रिया तेजस खेमणर यांनी सांगितले.

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे शिक्षण संचालक डॉ प्रदीप दिघे, आश्वी कॉलेजचे कॅम्पस संचालक डाॅ. महेश खर्डे, पद्मश्री विखे पाटील कॉलेजचे कॅम्पस डाॅ. आर.ए. पवार, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर, राहता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप,प्लेलमेंट विभागाचे डाॅ.मनोज परजणे,डाॅ.शैलेश कवडे-देशमुख यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!