अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

दुष्काळावर मात करत संजीवनीचे मार्गाक्रमण यशस्वी करू-बिपीनदादा कोल्हे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात दिपावली सणानिमीत्त बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

कोपरगाव – एल निनोच्या प्रभावांने यंदा दुष्काळाचे संकट मोठे आहे, उस उत्पादक सभासद शेतकरी बांधव आणि माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा मुलमंत्र जपत संजीवनीचे मार्गाक्रमण यशस्वी करू असा विश्वास देत प्रत्येकांने आर्थीकसह पाण्यांचे वर्षभराचे नियोजन करावे, शेतक-यांनी दहा गुंठे क्षेत्रात पंचवीस मे. टन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा, दैनंदिन खर्चात काटकसर करा, सामाजिक भान ठेवा, वंचित घटकांना दुष्काळात मदत करा तरच पुढची दिवाळी गोड होईल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

           सालाबादप्रमाणे याही वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे दिपावली सणानिमीत्त श्री. बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते रविवारी लक्ष्मीपुजन पार पडले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. कार्यकारी संचालक श्री. हनुमंत करवर यांनी उपस्थितांचे स्वागत करून चालु गळीत हंगामात युवाअध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्यात निर्माण होणा-या संकटावर मात करून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी ठरविलेले उददीष्ट साध्य करण्यांसाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू माझा कारखाना, माझी जबाबदारी हे ध्येय प्रत्येकांने जपावे असे ते म्हणांले. कारखान्याचे रोखपाल आर.टी. गवारे यांचा बक्षिस देवुन सन्मान केला.

            श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली संजीवनीने अनेक संकटाचा यशस्वी मुकाबला केलेला आहे. साखरेच्या दरात तेजी आल्यांने केंद्र व राज्य शासनाने थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल उत्पादन घेण्यांवर बंदी आणली आहे त्यामुळे देशात सर्वप्रथम संजीवनीने बायो सीएनजी प्रकल्प सुरू केला त्याच्यासमोर प्रेसमड व स्पेंटवॉशचा प्रश्न उभा राहिला आहे, दिवसेंदिवस एक एक नव-नविन आव्हाने येत आहे, संजीवनी युनीट क्रमांक दोन कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना रानवडचे गाळप क्षमता विस्तारीकरणांतही मशिनरी आधुनिकीकरणाचे प्रश्न आहेत त्याच्यासह संजीवनीचे गाळपातील समस्यांचे निराकरणासाठी रात्रंदिवस डोळयात तेल घालुन उपाययोजना सुरू आहेत. अधिकारी कामगार बांधवांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कमीत कमी स्टॉपेजेस कसे होईल यावर कटाक्ष ठेवावा, बॉयलिंग हाउस सुधारणेतुन आपण उसाचे गाळप सुरू ठेवले आहे, कारखान्याला लागणारी स्टीम ३८ वरून ३६ टनांवर कशी आणता येईल याचेही नियोजन आपण दिले आहे. ग्रामिण अर्थकारणाची कामधेनू म्हणुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मार्गाक्रमण सुरू आहे. छोटी अडचण मोठी होवु नये यावर आपले अहोरात्र काम सुरू आहे. येथुन मागच्या काळात आपल्या तालुक्यावर ज्या ज्या वेळी दुष्काळाचे संकट आले त्याची तीव्रता कमी करण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहांने जबाबदारीने काम केले मात्र त्यासाठी तुम्हां आम्हां सर्वांची साथ महत्वाची आहे. काटकसरीचा मंत्र ठेवा तरच पुढचे धोके कमी होतील असेही ते शेवटी म्हणांले.

             याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले, विश्वासराव महाले, शिवाजीराव वक्ते, संजय होन, मोहनराव वाबळे, निवृत्ती कोळपे, सोपानराव पानगव्हाणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, सुनिल चव्हाण, कैलास माळी, शरद थोरात, केशवराव भवर, डॉ. गुलाबराव वरकड, अशोकराव औताडे, दगुराव चौधरी, कामगार नेते मनोहर शिंदे, मच्छिंद्र लोणारी, संचालक त्रंबकराव सरोदे, विलासराव वाबळे, बाळासाहेब वक्ते, मनेष गाडे, बापूसाहेब बारहाते, राजेंद्र कोळपे, ज्ञानदेव औताडे, तुळशीराम माळी, सतिष आव्हाड, ज्ञानेश्वर होन, संजय औताडे, रमेश घोडेराव, फकिरराव बोरनारे, संभाजीराव बोरनारे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, उस उत्पादक सभासद शेतकरी, उस वाहतुकदार, आदि उपस्थित होते. शेवटी सचिव तुळशीराम कानवडे यांनी आभार मानले. 

               

दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर सत्कार न स्विकारता मदत करा आपल्या आवाहनाला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्यातुन ६५ पोते धान्य जमा झाले आहे असे बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!