अहिल्यानगर जिल्हा

बालचित्रकला स्पर्धेत जयवर्धन माने देशमुख याची जिल्हास्तरीय बक्षिसासाठी निवड

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कलागुणांचे सर्वत्र कौतुक

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी-महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित बालचित्रकला स्पर्धा २०२६ मध्ये लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी जयवर्धन गणेश माने देशमुख याने आपल्या कलागुणांच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत त्याची जिल्हास्तरीय बक्षिसासाठी निवड झाली.

 

चित्रकलेच्या माध्यमातून कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीला वाव देणाऱ्या या स्पर्धेत जयवर्धनने आपल्या प्रतिभेची छाप उमटवली. त्याच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात प्रगती करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.जयवर्धनला शाळेच्या प्राचार्या शैलेजा घोरपडे, कला शिक्षक सतीश जाधव आणि भारती थाटे यांचे मार्गदर्शन लाभले.  

 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त संचालक डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे आणि डॉ. महेश खर्डे,प्रा.विजय आहेर आदींनी जयवर्धनचे अभिनंदन केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!