
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कोपरगाव शहरातील भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्ष पराग संधान यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्यायाची दिशा दिली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांमुळे समाजात समतेची भावना रुजण्यास मदत झाली आहे. त्यामुळे संविधानातील मूल्यांचे जतन करणे आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे संधान यांनी सांगितले.याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत, नगरसेवक संजय उदावंत, नगरसेवक संतोष शिंदे,बौद्धचार्य विजुभाऊ बातंकर,विलास गवळी,दगू साबळे,देवराम पगारे,बाबासाहेब पगारे,अजय दिघे,किरण गायकवाड,नितीन शिंदे,गणेश निळे यांच्यासह विविध कार्यकर्ते, पालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.