महाराष्ट्र

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरणी खासदार निलेश लंके समर्थक आरोपी शरद खंडू पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण केल्‍याच्‍या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेला चिंचोडी पाटीलचा सरपंच आणि खासदार निलेश लंके समर्थक आरोपी शरद खंडू पवार याचा जामिन अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्‍य न्‍याय दंडाधिकारी श्री एस आर शिंदे यांनी फेटाळला आहे.

 

   सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोस्ट केल्‍याचे कारणाने किशोर महादेव परभणे यांचे अपहरण करुन, त्‍यांना खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहान केल्‍याची घटना घडली होती. त्‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे यांच्‍यावर ४ मे २०२६ रोजी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्‍याबाबत सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोष्‍ट केल्‍याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती.

 

      या घटने संदर्भात पोलिसांनी शरद खंडू पवार यास अटक करुन, अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे यांच्या न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पवार हा कोठडीत असताना तपासी अधिका-यांना या संदर्भात उडवा उडवीचे उत्‍तर देत समाधानकारक माहीती न दिल्‍याने पोलिसांनी त्‍यास पुन्‍हा न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली. 

 

जामीन मिळावा म्‍हणून, शरद खंडू पवार याने न्‍यायालयात प्रयत्‍न केले होते. याबाबतची सुनावणी अहिल्‍यानगर येथील अतिरिक्‍त न्‍यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे कोर्ट क्रमांक 17 यांच्‍यासमोर झाली. मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड.आनंद व्‍यवहारे यांनी बाजू मांडली तर, सरकार पक्षाच्‍या वतीने अॅड. धैर्यशील उर्फ अजित लक्ष्‍मण वाडेकर यांनी बाजू मांडून शरद पवार यांच्‍या जामीण अर्जास विरोध केला.न्‍यायालयाने दोन्‍हीही बाजूचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्‍यानंतर शरद खंडू पवार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता या घटनेत शरद खंडू पवार याच्‍या चौकशीतून बरेच कारनामे समोर येण्‍याची शक्‍यता आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!