
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथील जागृत देवस्थान तसेच गावचे ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज आणि मासूम बाबा यात्रोत्सव दिनांक 24 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत मोठया उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रोत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी सुधाकर चौधरी, उपाध्यक्षपदी रवींद्र चौधरी,तर खजिनदारपदी पंडित चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

सालाबादाप्रमाणे रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून संपूर्ण राहाता तालुक्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.गुरुवारी गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर पंचक्रोशीतील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री रोकडोबा मंदिर येथे आगामी यात्रोत्सवाच्या आयोजनानिमित्त खेळीमेळीच्या वातावरणात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून यात्रोत्सव समितीची स्थापना करण्यात आली.

या यात्रोत्सवादरम्यान श्रीराम जन्मोत्सव मिरवणूक, मासूम बाबा संदल, पारंपरिक दशावतारी सोंगे, कुस्ती, हगामा तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.सर्व कार्यक्रम सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी यात्रोत्सव समिती मोलाची भूमिका बजावते. गावातील थोर ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीतील अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार तसेच सदस्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या असून यावेळी समस्त ग्रामस्थांनी नूतन यात्रा कमिटीचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.
यावेळी जेष्ठ नेते गंगाधर चौधरी,दिलीप चौधरी, शंकर चौधरी, बाळासाहेब चौधरी, किरण चौधरी, विजय चौधरी, गोपीनाथ चौधरी, यशवंत चौधरी, महेंद्र चौधरी, बाबासाहेब चौधरी, खंडेराव वाघ, मच्छिंद्र चौधरी, अशोक शिंदे, बापुसाहेब चौधरी, प्रवीण चौधरी, डॉ.गोरक्षनाथ चौधरी, चंद्रकांत चौधरी, भागवत वाघ, शिवाजी चौधरी, भाऊसाहेब लोहकरे,सुलतान शेख, शाहू साळवे, अमोल चौधरी, संतोष कापसे, राहुल चौधरी,बालू गुंजाळ,संतोष गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




