Uncategorized

वाकडी शाळेला १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेची भेट; साउंड सिस्टीम देत आदर्श प्रेरणा!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

वाकडी – जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, वाकडी येथे इयत्ता चौथी (सन 1993-94) मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत शाळेसाठी उत्कृष्ट दर्जाची साउंड सिस्टीम सप्रेम भेट दिली. आपल्या प्राथमिक शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी आदर्श पायंडा पाडला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणप्रेमी व समाजसेवक मा. अण्णासाहेब गंगाधर कोते होते.यावेळी 1993-94 च्या बॅचमधील मा. श्री.राजेंद्र आहेर, मा. श्री.अण्णासाहेब  कोते, श्री. महेश म्हस्के, सौ. कांचनताई गोंदकर, सौ. मायाताई  शेळके, सौ. प्रेरणाताई बोठे, श्री.विजय आहेर या माजी विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष अण्णासाहेब कोते म्हणाले, “या जिल्हा परिषद शाळेत शिकून आम्ही सर्वजण चांगल्या ठिकाणी पोहोचलो आहोत. कुणी नोकरीत आहे, तर कुणी स्वतःचा व्यवसाय उत्तम प्रकारे करत आहे. आज जे काही झालो आहोत, त्याचे श्रेय या शाळेला जाते. त्यामुळे या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही ही भेट दिली आहे.”

सौ. कांचनताई गोंदकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना “शाळेतील सध्याचा बदल पाहून खूप आनंद होतोय,” अशा भावना व्यक्त केल्या. दत्तगुरु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. विजय आहेर यांनीही शाळेच्या पुढील विकासासाठी “कधीही हाक द्या, आम्ही तयार आहोत,” असे आश्वासन दिले.

या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिवटे सर, श्री. भालके सर, श्री. ईडलवार सर, श्री. जगदाळे सर, सौ. महांकाळे मॅडम, सौ. सदाफळ मॅडम, सौ. कुमावत ताई, स्कूल कमिटी अध्यक्षा सौ. मेघाताई जोशी, मा. स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. निलेश लहारे, स्कूल कमिटी सदस्य श्री. प्रदीप जगदाळे, श्री. श्रीकांत साबळे, श्री. दीपक वेताळ, श्री. दिगंबर कोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिक, पालक श्री. सचिन खजिनदार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बनसोडे सर यांनी केले. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार श्री. भालके सर यांनी मानले.

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!