महाराष्ट्र

अभिनेता धर्मेद्रजी यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुवर्णयुग थांबले- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी –भारतीय सिनेसृष्टीतील करीश्माई आणि रसिकांच्या मनात राहीलेले अभिनेता धर्मेद्रजी यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुवर्णयुग थांबले असल्याची भावना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

 

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की,धर्मेद्रजी आपल्या साधेपणातील व्यक्तिमत्वाने आणि अप्रतिम अभिनयाने लाखो रसिकांच्या मनात घर करून होते.शोलेतील धडाडीचा वीरू,अनुपमातील शांत प्रेमळ किंवा धरमवीर मधील त्यांची भूमिका तडफदार आणि तितकीच हिंदी चित्रपट सृष्टीचा वारसा बनून राहीली.बहारदार अभिनय आणि तितक्यात सहजतेने एक कलाकार म्हणून त्यांचे संवादकौशल्य तितकेच दमदार आणि कलाक्षेत्रात आपले वेगळेपण सिध्द करणारे होते.

 

सिनेसृष्टीतील आपल्या संपूर्ण कार्यकाळात प्रचंड मेहनत जिद्द आणि कलाकार म्हणून निष्ठेचे एक उतम उदाहरण होते.त्यांच्या निधनान सिनेसृष्टीने एक अनुभवी अभिनेता गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!