
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता- तालुक्यातील चितळी स्टेशन येथे दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) शाखेचा 20 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चितळीचे सरपंच नारायणजी कदम यांनी भूषविले. यावेळी गुजरात दक्षिण आरपीआय अध्यक्ष गिरीजी धाकड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्य सचिव दिपक गायकवाड, गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी, बहुजन टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संजय रूपटक्के, भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सचिन ब्राह्मणे, रमेश घोडेराव, येलार गायकवाड, छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या सोबत फकीरा मामा गायकवाड, संदीप बनसोडे, रवी थोरात तसेच चळवळीतील अनेक सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी बहुजन चळवळ, संघटनवाढ व सामाजिक परिवर्तनाच्या विविध मुद्द्यांवर आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थित कार्यकर्त्यांनी आरपीआयच्या पुढील संघर्षमय वाटचालीची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता झाली.




