महाराष्ट्रराजकीय

जनतेच्या पाठीशी उभं राहून संकटांवर मात करणे हीच महायुती सरकारची भूमिका – जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहाता तालुक्यातील जळगाव येथे १ कोटी १३ लाख निधीतून विविध विकासकामांचा ना. विखे पाटलांच्या हस्ते शुभारंभ

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्य विकासाच्या दिशेने मोठी झेप घेत आहे,जनतेच्या पाठीशी उभं राहून संकटांवर मात करणे हीच महायुती सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहाता तालुक्यातील जळगाव येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून गुरुवारी (दि.13) विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ गावातील महिला बचत गटांनी उमेद योजनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या बचत गट महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक अण्णासाहेब चौधरी होते. व्यासपीठावर जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, माजी जि.प. सदस्य राजेंद्र लहारे,डॉ.धनंजय धनवटे, ऍड.अशोकराव वाघ,सरपंच शिवाजीराव साबदे,उपसरपंच दिलीपराव चौधरी, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोरकडे, माजी संचालक भाऊसाहेब शेळके, छावा ब्रिगेडचे विश्वनाथ वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. जळगाव–एलमवाडी, वाकडी, चितळी, पुणतांबा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बचत गट तसेच शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसांनी जळगावला येण्याचा योग आला. महसूलमंत्री असताना नव्याने स्थापन होणाऱ्या गावठाणासाठी 10 एकर विनामूल्य जमीन दिली. त्या ठिकाणी सुमारे 350 घरकुले उभारली जातील.जलजीवन मिशनसाठी एलमवाडी स्मशानभूमी साठी जागा नव्हती; ती शेती महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. जळगाव हे खंडकऱ्यांचे गाव असून येथील सर्व खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग–2 मधून वर्ग–1 मध्ये विनामूल्य केल्या. महसूलमंत्री असताना कोणताही दुजाभाव केला नाही.शासनाच्या योजणांचा लाभ सर्वांना मिळावा, हा आमचा प्रयत्न राहिला.ते पुढे म्हणाले गावाचा विस्तार थांबला होता. गावठाण शिल्लक नव्हते, घरकुल मंजूर होत नव्हते.महसूलमंत्री असताना शेती महामंडळा कडून आम्ही 10 एकर जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने ही अडचण दूर झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक घरकुले राहाता तालुक्यात उभी राहत आहेत, त्यातील 350 घरकुले जळगावात होणार आहे ही अभिमानाची बाब आहे.

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून राहाता तालुक्याला 44 कोटी 39 लाख रुपये प्राप्त झाले. जळगाव येथील 552 शेतकऱ्यांच्या खात्यात 52 लाख 64 हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र 53 शेतकऱ्यांनी वेळेवर केवायसी न केल्याने ते वंचित राहिले असल्याचे सांगून, संबंधित अधिकाऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करून शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत मिळण्याचे निर्देश दिल्याचे ना. विखे यांनी नमूद केले.लाडकी बहीण योजना सातत्याने सुरू आहे. विरोधकांनी ही योजना बंद करण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु आज त्यांच्या हातात काही उरलेले नाही.असे त्यांनी सांगितले.महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा पूर्वी 3 लाख होती, ती आता 5 लाख करण्यात आली आहे.यामुळे गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात वाकडी फाटा ते जळगाव रस्त्यांच्या कामासाठी 40 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.आदरणीय विश्वनेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना अंमलात आणली.यामुळे सर्वांना फायदा झाला.

 

 

शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका कधीही सोडलेली नाही:मंत्री विखे पाटील

 

आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका कधीही सोडलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे.सहकार चळवळ सक्षम व्हावी या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो; मात्र याच सहकार चळवळीला गालबोट लावण्याचे काम महाराष्ट्रातील एका नेत्याने केले. त्यांच्यामुळे अनेक सहकारी कारखाने खाजगी झाले आणि शेतकरी अडचणीत सापडले.महाराष्ट्रातील ‘जाणते राजे’ स्वतःला मोठे नेते समजतात, असा खोचक टोला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर लगावला.

 

 

ते पुढे म्हणाले“पूर्वी बंद पडलेला गणेश कारखाना आम्ही सहकारी तत्त्वावर सुरू ठेवला.तो खाजगीकरणापासून वाचवला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी देशाचा पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही काम करत आलो. गणेश कारखाना सहकारी ठेवण्यात जे यश मिळाले, ते मला कायम समाधान देणारे आहे.यावेळी जळगाव गावातील सुरू असलेल्या विकास प्रक्रिया तसेच महायुती सरकारमार्फत राबवल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांनी शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचत असून गावाचा सर्वांगीण विकास वेगाने होत असल्याचे समाधान व्यक्त केले.

 

मनोगत व्यक्त करताना सरपंच शिवाजी साबदे म्हणाले कोपरगाव मतदार संघात जोडलेल्या 11 गावापैकी सर्वाधिक चांगले कामं करू शकलो ही प्रगती ना. विखे यांच्या सहकार्यामुळे झाली आहे.कोरोना काळात ना. विखे यांनी सांगितले होते ‘की तु काळजी करू नको सर्व कामे होतील’ ना. विखे पाटलांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळेच कामे पुर्ण झाले आहे.विखे कुटुंबाचे मोलाचे सहकार्य लाभले.जळगाव-लालवाडी रोडची अवस्था दशके दयनीय होती. पावसाळ्यात दुध उत्पादकांना किटली डोक्यावर घेऊन प्रवास करावा लागत होता. 2021 मध्ये सरपंचपद स्वीकारल्यापासून मंत्री विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.ते पुढे म्हणाले जळगाव–एलमवाडी परिसरातील अंतर्गत 100% रस्ते पूर्ण, वाड्या–वस्त्यांवरील 80% रस्ते पूर्ण, वाकडी फाटा–पुणतांबा रोड, टिळेकर वस्ती, चौधरी वस्ती आदी रस्त्यांची कामे अत्यंत दर्जेदार झाली आहेत.महसूलमंत्री असताना विखे पाटलांनी 10 एकर जमीन उपलब्ध करून दिल्याने अनेक कुटुंबांना हक्काची जागा मिळाली.शिवस्मारकासाठी 3 एकर जमीन देऊन त्यांनी शिवप्रेमींची मनोकामना पूर्ण केली.आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्या कडे कामासाठी गेलो, तेव्हा कधीही रिकाम्या हाताने परत आलो नाही. त्यांनी दिलेले प्रत्येक शब्द पाळले, असे ते म्हणाले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!