प्रशासकीयमहाराष्ट्र

पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे उद्या होणार १ कोटी १३ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण रु. १ कोटी १३ लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.या भूमिपूजनाचा भव्य सोहळा गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पार पडणार असून, या विकासकामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालय,जळगाव येथे संपन्न होणार असल्याची माहिती सरपंच शिवाजीराव साबदे यांनी दिली आहे.

जाहिरात.. ADVT
जाहिरात.. ADVT

आयोजित कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील कोपरगाव विधानसभा मतदार संघांचे आ.आशुतोष काळे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ग्रामपंचायत कार्यालय, जळगाव ता. राहाता येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा सकाळी १०.०० वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ,कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.या उपक्रमामुळे जळगाव परिसरातील विकासाला नवे बळ मिळेल व ग्रामीण भागाच्या प्रगतीचा वेग वाढेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!