
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील चितळी स्टेशन येथे तब्बल पाच वर्ष्याच्या प्रतीक्षेनंतर निझामाबाद-पुणे डेमो एक्सप्रेस गाडी थांबायला हिरवा कंदील मिळाला असुन रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे ग्रामीण भागातील प्रवाश्यांनी स्वागत केले सरपंच नारायणराव कदम यांनी लोकोपायलटसह रेल्वेच्या पुणे डिव्हीजनमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करत आभार मानले आहे.

चितळी स्टेशन येथे निझामाबाद-पुणे डेमो एक्सप्रेस दाखल झाल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले कोरोना काळानंतर पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ओसाड पडलेल्या स्टेशनवर तिकीट खिडकी खुली करण्यात आली असून निझामाबाद-पुणे एक्सप्रेस (११४०९) दुपारी १२:३० वाजता आणि पुण्याहुन मनमाडकडे येणारी (११४१०) गाडी संध्याकाळी ८:१५ वाजता नियमित थांबणार आहे अशी माहिती स्थानिक रेल्वे व्यवस्थापक प्रशासनाने नागरिकांना दिली असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.त्यामुळे स्टेशनवर प्रवाश्यांची वर्दळ सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

कमी दरात रेल्वेचा प्रवास असल्यामुळे स्थानिकांना बाहेरगावी जाणे सुलभ व्हायचे तसेच नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळायचा मात्र,कोरोनाचे संकट ओढवून आल्यानंतर प्रवासी उपलब्ध नसल्याने सर्व गणिते कोलमडून गेले त्याकाळी प्रवासी संख्येत मोठी घट झाली.त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडकी बंद करण्यासोबतच विविध गाड्यांचा थांबा देखील रद्द केला.त्यामुळे काही काळ सदर स्टेशन प्रवासी आणि पॅसेंजर गाड्याविना तसेच ओसाड पडले होते.रेल्वे सेवा नियमित सुरु झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा आधार मिळाला आहे.
प्रवाश्यांची व्हायची गैरसोय..!
कोरोनाकाळाच्या दरम्यान स्थानकावर कोणत्याही पॅसेंजर गाडीला थांबण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती.त्यामुळे नगर-दौंड मार्गावर धावणाऱ्या गाड्या चितळी स्थानक वगळून धावत होत्या.परिसरातील विद्यार्थी,शासकीय कर्मचारी,आदी प्रवाश्यांची गैरसोय होती.पर्यायी मार्ग म्हणून त्यांना बेलापूर-कोपरगाव किंवा नगर येथील स्थानकावर जाऊन पुढचा प्रवास करावा लागत होता.यामुळे वेळ व पैसा वाया जात असे.खाजगी वाहणाने प्रवास भाडे न परवरडनारे असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत होता.
चितळी रेल्वे स्थानकावर पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी दीर्घकाळापासून करायचे.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह रेल्वे प्रशासनाला याबाबत अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला.प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेतली चितळी येथे निझामाबाद-पुणे डेमो एक्सप्रेसला थांबा दिला आहे.यामुळे स्थानकावरील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे – नारायणराव कदम, सरपंच चितळी




