कोपरगाव तालुका

चितळीतील विजय पठारे यांची कोपरगाव तालुका पूर्व मंडलाच्या उपाध्यक्षपदी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

चितळी –  भारतीय जनता पार्टीच्या अनु-जाती कोपरगाव तालुका पूर्व मंडलाच्या उपाध्यक्षपदी विजय जनार्दन पठारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली यावेळी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते नवनियुक्त उपाध्यक्ष विजय पठारे यांचा सन्मान करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

 

भारतीय जनता पार्टीच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व मंडल, पश्चिम मंडल तसेच शहर कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी बंधू-भगिनींचा भव्य सत्कार समारंभ गुरुवार (दि.१४ ऑगस्ट) रोजी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह साखर कारखाना, सहजानंदनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

 

या प्रसंगी विजय पठारे म्हणाले की, “संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून कोपरगाव मतदारसंघात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि समाजातील अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी  मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!