आरोग्य

अंगदान – जीवन संजीवनी अभियानात” डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलचा उत्साही सहभाग!

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जनजागृती कार्यक्रमात प्रभावी मांडणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर  –“अंगदान  जीवन संजीवनी अभियान 2025-2026” अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय आयोजित जनजागृती कार्यक्रमात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटल, अहिल्यानगर यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.

 

डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेच्या प्रसारासाठी डायरेक्टर ऑफ मेडिकल डॉ. अभिजित दिवटे, डॉ. ब्रिगेडीयर अरुण त्यागी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश देशपांडे, डॉ. सतिश मोरे, डॉ. प्रसाद काजळे, डॉ. अभिजित मिरेकर यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत.

 

अंगदानाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी परिसरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालय कर्मचारी तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून जनसहभागावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्या अवयवदान विभागाचे समन्वयक राज गिऱ्हे यांनी जिल्हा रुग्णालय आयोजित कार्यक्रमात मोहिमेची सविस्तर माहिती देत अंगदानाचे महत्त्व पटवून दिले.

 

हॉस्पिटलच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक यशस्वी अवयव प्रत्यारोपण झाले असून, या उपक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमादरम्यान अहिल्यानगर शहरात प्रभावी बाईक रॅली काढून नागरिकांना अंगदानाचे महत्त्व समजावून देण्यात आले.या प्रसंगी शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, मेडिकल स्टाफ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!