(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयांतील वनस्पती शास्ञ विभागाच्या विद्यार्थीनी सौ.कविता प्रदिप तांबे यांनी सादर केलेल्या टाॅमटो पिकांवरील येणारा करपा कसा कमी करावा या विषयांवर सादर केलेल्या शोधनिंबधास साविञीबाई फुले पुणे विद्यापीठांची पी.एचडी प्रदान कलण्यात आली.
शेतकरी कुंटुंबातील कविता तांबे यांनी घर संसार बघून हे यश संपादन केले असून त्या कृषिभुषण शेतकरी आणि विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक प्रताप सखाहरी तांबे यांच्या सुनबाई आहेत.त्यांना डाॅ.एस.पी.गिरी,डाॅ.ए.एम.भोसले,डाॅ.प्रदिप भोसले,कॅम्प संचालक डाॅ.आर.ए.पवार, डाॅ.महेश खर्डे,डाॅ.आर.डी.बोरसे, यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ.तांबे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.




