Uncategorized

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा: १७.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध कारवाई

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून तब्बल १७ लाख ३२ हजार ९९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, १२ आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ जुलै रोजी विशेष पथकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. पोलीस पथकाने पाठलाग करून १२ इसमांना ताब्यात घेतले.

 

या आरोपींच्या ताब्यातून ९२,९९० रुपये रोख, २,४०,००० रुपये किमतीचे १६ मोबाईल फोन, तसेच १४,००,००० रुपये किमतीची ६ वाहने असा एकूण १७,३२,९९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४२०/२०२५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:

अनिकेत सुभाष कु-हाडे (२४, रा. गजराजनगर),राहुल वाळु लड्डा (३५, रा. मंगलगेट),भुषण भगवान धाडगे (३२, रा. पंचवटी कॉलनी, भिस्तवाग चौक),मुस्सा इसा शेख (६०, रा. घासगल्ली, कोटला),दिलीप शिवाजी दुसुंगे (४०, रा. कापुरवाडी),जिशान राजु इनामदार (३२, रा. जावेद कॉम्प्लेक्स, मुकुंदनगर),आसलम मोहंम्मद शेख (५५, रा. हातमपुरा),उमेश किसन कोतकर (४०, रा. कांदा मार्केट, केडगाव),समिर सैद सय्यद (४७, रा. शिरुर बस स्टँड, जि. पुणे),रफिक हसन शेख (३२, रा. बडी मस्जिद जवळ, मुकुंदनगर),अल्ताप मुस्ताक शेख (३४, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर),शब्बीर हुसेन खान (६४, रा. मोठी मस्जिद, मुकुंदनगर).

 

ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती

कारवाईत सहभागी विशेष पोलीस पथक:

पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ,पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, योगेश भिंगारदिवे, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे,पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव, अतुल लाटे.या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर मोठा आघात बसला असून, जिल्ह्यातील इतर ठिकाणीही लवकरच अशा स्वरूपाच्या कठोर कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!