Uncategorized

प्रवरा अभियांञिकीमध्ये हॅकॅथॉन ५.० नोंदणीसाठी माहीती कक्ष;

सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

 

लोणी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे एमएसएमई आयडिया हॅकॅथॉन ५.० स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह महिला स्टार्टअप्स आणि पुरुष (६० वर्षांपर्यंत वयोगटातील) एमएसएमई उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, समस्या सोडवण्यासंदर्भात नाविन्यपूर्ण कल्पना ३१ जुलैपर्यंत मागविण्यात आल्या आहेत.

 

प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज, लोणी येथील इंक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून या हॅकॅथॉनमध्ये सहभाग नोंदविता येणार असल्याची माहिती प्रिझम फोरमचे सीईओ डॉ. संजय कुरकुटे यांनी दिली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची निवड तज्ञ निवड समितीद्वारे करण्यात येणार असून, निवड झालेल्या नवउद्योजकांना सलग्न इंक्युबेटरमध्ये प्रोटोटाईप स्टेजसाठी इनक्युबेशन प्रोग्राम अंतर्गत प्रवेश दिला जाईल. याशिवाय निवड झालेल्या स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य (सीड फंड) एमएसएमई मंत्रालयातर्फे दिले जाणार आहे.

 

या उपक्रमामागील उद्देश म्हणजे भारतातील महिला, युवक आणि नागरिकांनी स्थानिक समस्यांवर स्थानिक व नाविन्यपूर्ण उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे. ‘एमएसएमई इनोव्हेटिव्ह’ ही एक समग्र संकल्पना असून, इनक्युबेशन, डिझाईन इंटरव्हेन्शन आणि आयपीआर संरक्षण या तीन घटकांवर लक्ष केंद्रित करून नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

 

या संपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील इंक्युबेशन सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, डॉ. संजय कुरकुटे आणि डॉ. एस. बी. मगर यांनी केले आहे.

 

 

 नोंदणी करण्यासाठी खालील लिंक ओपन करा. 👇

https://my.msme.gov.in/inc/Hackathon_Reg.aspx

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला विद्यार्थीनी, महिला उद्योजिका आणि महिला एमएसएमई उद्योजकांनी https://my.msme.gov.in/inc/Hackathon_Reg.aspx या संकेतस्थळावरून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!