Uncategorized

कृषि शिक्षण प्रवेशासाठी प्रवरा कृषी शास्र संस्था, लोणीमध्ये सहायता केंद्र सुरु

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी  – शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ साठी कृषि व कृषि सलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. प्रवेश अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी सामोरे जावे लागते. त्यात प्रामुख्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा करावा ? इच्छुक महाविद्यालयाचा सांकेतांक आणि प्राधान्यक्रम कसा द्यावा ? योग्य महाविद्यालय कसे निवडावे ? असे अनेक प्रश्न आणि संभ्रम विद्यार्थी तसेच पालक यांच्या समोर असतात.

 

ग्रामीण भागातील मुलांच्या अडचणी लक्षात घेऊन, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोईसाठी लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील, कृषि संचालक डॉ.उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. या केंद्राद्वारे केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याकरिता नि:शुल्क सुविधा देण्यात येणार आहे. सदर सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 

अधिक माहितीसाठी कृषी महाविद्यालयचे, समन्वयक प्रा.अमोल खडके (९७६६५६२३३०), कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा.महेश चंद्रे(७४४८०५९७८८), कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. संतोष वर्पे (७३८७४४२०४६)व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. चंद्रकला सोनवणे(७९७२९९९४६४) यांच्याशी संपर्क करावा. 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!