Uncategorized

इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनीरिंग: भविष्यातील यशाचा पाया घालणारी सशक्त शैक्षणिक दिशा  – डॉ. पंकज प्रमोद चित्ते

विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स अॅड कॉम्पुटर इंजिनीरिंग प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेज लोणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

आजच्या २१व्या शतकात जग झपाट्याने बदलत आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता , इंटरनेट ऑफ थिंग्स , बिग डेटा, आणि मशीन लर्निंग यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांनी आपले दैनंदिन जीवन सोपे आणि अधिक स्मार्ट केले आहे, तर दुसरीकडे डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे तरुण अभियंत्यांना प्रचंड संधींचे दालन खुले झाले आहे. या सर्व बदलांमधून जो सक्षम अभियंता निर्माण होतो तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर अभियंता आहे.

 

 या शाखेचे विशेष वैशिष्टे म्हणजे हार्डवेअर व आणि सॉफ्टवेअर यांचे परिपूर्ण मिश्रण

इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनीरिंग ही अशी शाखा आहे जिथे संगणक प्रणालींचे सखोल ज्ञान, इलेक्ट्रॉनिक घटकांचे व्यवहारज्ञान, प्रोग्रामिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मायक्रोकंट्रोलर्स आणि विविध डिजिटल प्रणालींचे यशस्वी एकत्रिकरण शिकवले जाते. हे शिक्षण केवळ सैद्धांतिक नसून, प्रकल्पाधिष्ठित, संशोधनाभिमुख आणि इंडस्ट्री केंद्रित आहे.

 

विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग भाषांची सी,सी प्लस प्लस,जावा, सी, सी++, पायथॉन, जावा), आयओटी डिव्हाइसेस, पीसीबी डिझाइन, आर्डिनो. रास्पबेरी पाय, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबरसुरक्षा, रोबोटिक्स यांची प्रत्मक्ष हाताळणी करावी लागते.शैक्षणिक अभ्यासक्रमात तर हा विद्येचा व्यापक फलक दाखवणारा कोर्स आहे. या कोर्से मध्ये विद्यार्थ्याला प्रथम वर्षात बेसिक इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्रामिंग फंडामेंटल्स, गणित, फिजिक्स, डिजिटल लॉजिक, द्वितीय वर्षात डेटा स्ट्रक्चर्स, मायक्रोकंट्रोलर्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, IoT बेसिक्स, तृतीय वर्षात एम्बेडेड सिस्टम्स ओएस, संगणक नेटवर्क्स, एआय आणि एमएल, सेन्सर्स आणि अॅक्युएटर्स प्रोजेक्ट वर्क तर चतुर्थ वर्षात व्हीएलएसआय, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, क्लाउड टेक्नॉलॉजी, कॅपस्टोन प्रोजेक्ट, ऐच्छिक (सायबर सुरक्षा, ब्लॉकचेन, रोबोटिक्स) या भविष्याचे दृष्टीने व गरज असलेल्या विषयाचे सखोल ज्ञान मिळते.

 

आजच्या उद्योगविश्वात शाखेची गरज आणि मागणी मोठी आहे.इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनीरिंग शाखेचे अभियंते हे पारंपरिक इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर उद्योगांबरोबरच खालील क्षेत्रांत देखील अत्यंत मागणीचे झाले आहेत आय.टी. क्षेत्र सॉफ्टवेअर डेव्हलपर, क्यु.ए. इंजिनिअर, डेटा अॅनालिस्ट, ऑटोमेशन क्षेत्र, डेव्हलपर, स्मार्ट होम सिस्ट्र‌म डिझायनर, आरोग्य क्षेत्र हेल्थकेअर टेक, बायोइलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इमेज प्रोसेसिंग, डिफेन्स आणि अंतराळ संशोधन डी आर डी ओ , आय एस आर ओ , बी ई एल, बी ए आर सी, उच्च शिक्षण आणि संशोधन गेट, जी आर ई,एम.एस/ एम टेक, यासह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध जागतिक करिअर संधी उपलब्ध आहे सॉफ्टवेअर,

इलेक्ट्रॉनिक्स,वायर्ड/वायरलेस नेटवर्क्स,आॅटोमोबाईल्स,स्टार्टअप्स

संधीा इंडस्ट्री इंटरफेस आणि! कौशल्य विकास या इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनीरिंग शाखेच्या अंतर्गत विद्यार्थाना इंटर्नशिप, फील्ड व्हिजिट्स. गेस्ट लेक्चर्स,आयआयटी,एनपीटीईएल, आधारित प्रमाणपत्र कोर्सेस, स्टार्ट अप इनक्युबेशन सपोर्ट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धा इत्यादी मध्ये सुद्धा संधी आहेत.आजच्या युवा अभियंत्यांमध्ये केवळ नोकरी मिळवण्याची नाही तर स्वतःची कंपनी सुरू करण्याची क्षमता आहे. कॉलेज स्मरावरच स्टार्टअप लॅब्स, मिनी मेकाथॉन, प्रोटोटायपिंग लॅब्सद्वारे नवीन कल्पना प्रत्मक्षात उतरवता येतात.

 

इलेक्ट्रॉनिक्स अॅड कॉम्प्युटर इंजिनीरिंग ही फक्त शाखा नाही, ती तुमच्या स्व‌प्नांना आकाश छेदण्याची दिशा आहे. ही शाखा तुम्हाला केवळ अभियंता बनवत नाही, तर एक सर्जनशील विचारवंत, उत्तरदायित्व असलेला नागरिक, आणि भविष्यातील उद्योजक बनवते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!