Uncategorized

थाटमाठात नव्हे, साधेपणात मोठेपण असतं! डॉ. सुजय विखे पाटील आणि खासदार संदीपान भुमरे यांचा दुचाकीवरून एकत्र प्रवास

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

नेवासा -नेतेमंडळींच्या गाड्यांचा ताफा, सुरक्षारक्षकांचा गराडा आणि थाटमाठ पाहणे ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, नेवासा तालुक्यात आज एका कार्यक्रमात सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारा आणि ‘नेतृत्व’ म्हणजे काय, याचा खराखुरा प्रत्यय देणारा प्रसंग घडला.या प्रसंगी केंद्रस्थानी होते अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार मा.संदीपान भुमरे.

 

नेवासा तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी आगमन करताना या दोन्ही ‘दिग्गज नेत्यांनी’ ना कोणता ताफा वापरला, ना सुरक्षारक्षकांचा गाजावाजा केला. कोणत्याही थाटमाठाशिवाय त्यांनी साधी दुचाकी निवडली आणि त्या दुचाकीचे सारथ्य स्वतः डॉ. सुजय विखे यांनी हाती घेतले व थेट कार्यक्रमस्थळी प्रवेश केला,तर खासदार संदीपान भुमरे मागील सीटवर बसलेले होते.हा क्षण केवळ नेत्रसुखद नव्हता, तर तो नेत्यांच्या साधेपणाची आणि जनतेशी असलेल्या नात्याची गाथा सांगणारा ठरला.

 

कार्यक्रमस्थळी जमलेले नागरिक, कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे दृश्य पाहून स्तिमित झाले. ‘खरा नेता कोण?’ या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या कृतीतून मिळालं.राजकारणात भाषणं सर्व करत असतात, पण कृतीतून लोकांशी नाळ जुळवणं ही खरी कसोटी असते. आजचा हा साधेपणाचा प्रवास म्हणजे लोकशाहीतील विश्वास, पारदर्शकता आणि जवळिकतेचं जिवंत उदाहरण ठरलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!