
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी – राहुल राजळे
नेवासा -सोनई (ता.नेवासा) येथे सदगुरू शंकर महाराज मठ केडगाव प्रणित सदगुरु शंकर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि.३ )रोजी राष्ट्रीय धर्मगुरू अशोक महाराज जाधव यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली.मूर्ती प्रतिष्ठापना पूर्वी सदगुरु शंकर महाराज मंदिर ते त्रीलिंगी महादेव मंदिर सोनई येथे भक्तांच्या उपस्थितीत मूर्तीची मिरवणूक संपन्न झाली व त्रीलिंगी महादेवास महाअभिषेक संपन्न करण्यात आला व तद्नंतर विश्वकलण्यार्थ १२१ दत्तयज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी बोलतांना विश्वगुरू अशोक महाराज जाधव म्हणाले.सद्गुरू शंकर महाराज यांची भक्तिभावाने श्रद्धा केल्यास जीवनात निश्चितच बदल होतो तरुणांनीजीवनात धार्मिक कार्याला स्थान द्यावे असे म्हणाले.सोनई व परिसरातील शंकर महाराज भक्त परिवार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठबळातुन सोनईत साकारलेल्या शंकर महाराज मंदिरात सर्वानी धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले व उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी याप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
