प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा फार्मसीचा प्रथम वर्षाचा निकाल ९७ टक्के

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागामार्फत एप्रिल मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या औषधनिर्माण पदविका विभागाच्या अंतिम परीक्षेत लोणी येथील लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगाथायारू के. यांनी दिली.

 

यावेळी प्रथम वर्ष डी. फार्मसी या वर्षांचा निकाल ९७% तर द्वितीय वर्ष डी. फार्मसी या वर्षांचा निकाल ८५% लागला आहे, यात प्रथम वर्ष डी. फार्मसी अभ्यासक्रमात अनुक्रमे कु. वंदना सोमवंशी८४ .२०%, कु. सानिया इनामदार ८०.५०%, कु. पूजा सोनवणे ८०.४०% द्वितीय वर्ष डी. फार्मसी अभ्यासक्रमातुन अनुक्रमे कु. प्रतीक्षा गागरे ८५.४६%, चि. सुजित गाढवे ८५.१९% आणि पल्लवी वेलजाळी ८१.६४% गुण मिळवून विशेष प्रविण्यासहित प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले.

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे पाटील, यांनी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगाथायारू के व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!