प्रवरा शिक्षण संस्था

जिल्हास्तरीय वाॅटर पोलो स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश चार विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – अहिल्यानगर जलतरण संघटनेमार्फत पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी या ठिकाणी आयोजित केलेल्या वॉटर पोलो जलतरण स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ बी. बी. अंबाडे यांनी दिली.  

 

या स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी चार विद्यार्थ्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वॉटर पोलो स्पर्धेसाठी निवड झाली. निवड झालेल्या यशस्वी स्पर्धकांमध्ये इयत्ता दहावीचे कौस्तुभ चिवटे, प्रयागराज पवार, साईराम जाधव तर बारावीतील अर्कम शेख यांचा समावेश आहे.त्यांना प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य के टी. अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी आणि क्रीडा संचालक रमेश दळे व जलतरण प्रशिक्षिका सौ योगिता तनपुरे या सर्वांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

 

 

स्पर्धकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंधारण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनीही विशेष कौतुक केले. 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!