
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी- वैभव ताजणे
संगमनेर – उंबरी बाळापूर (ता.संगमनेर) येथील पार्थ बाबासाहेब भुसाळ (वय१८) हा मुलगा उपचारासाठी लोणी येथे जात होता. मात्र तिकीट काढण्या करीता त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. त्यामुळे ऑनलाईन पैसे मागवण्यासाठी आईला त्याने फोन केला. तरी ही बस वाहक यांनी असंवेदनशील पणा दाखवत मध्येचं म्हणजे दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथे त्याला उतरून दिले.
ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर यांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा घटनाक्रम सांगून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, उंबरी बाळापूर येथील पार्थ बाबासाहेब भुसाळ (वय- १८) इत्ताय १२ वी शिकत असलेला मुलगा आजारी असल्याने लोणी येथे उपचार घेण्यासाठी चालला होता. संगमनेर हून लोणीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये उंबरी बाळापूर येथून बसला होता.
यावेळी एसटीच्या महिला वाहक सौ बलमे बँच नंबर १८७५७ यांनी त्यांच्याकडे तिकीटासाठी सुट्टे पैसे मागीतले. मात्र, त्यांच्याकडे सुट्टे पैसे अथवा ऑनलाईनची पैसे देण्याची सोय नसल्यामुळे त्याने महिला वाहक यांचा फोन पे नंबर आईला पाठवून ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले. महामंडळाच्या एस टी ने प्रवास करताना सुट्टे पैसे असणे आवश्यक होते अशा अशयाचे सामाजिक संदेश एस टी तसेच बस स्थानका वर अनेकदा वाचण्यास मिळतात. जर वाहकाची चुकी असेल तर प्रवाशी पण या घटने मध्ये चुक असल्याचे दिसते. एकटा आजारी व्यक्ती प्रवास करणे चुकेचे आहे.त्याबरोबर कोणी तरी असणे अवश्यक असल्याचे काही प्रवासी चर्चा करत होते. दरम्यान ही पोस्ट समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यामुळे तालुक्यातील नागरीकांनी संताप व्यक्त केला.
- महिला एसटी वाहकाने आजारी मुलांसमवेत असंवेदनशील वर्तन करुन त्यांच्यातील माणुसकी मेली असल्याचे दाखवून दिले. या घटनेमुळे एसटी खात्याची मोठी बदनामी झाली आहे. त्यामुळे या असंवेदनशील वाहकांची चौकशी करून नोकरीतून बडतर्फ करण्याबरोबरच संगमनेर एसटी डेपो मॅनेजर यांचेवर देखील कारवाई करावी – सरुनाथ उंबरकर, संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोपक्षनेते
- माझा मुलगा पार्थ हा लोणी येथे वैद्यकिय उपचारासाठी चालला होता.सुट्टे पैसे नसल्या मुळे मुलांने मला भाड्याचे पैसे फोन पे द्वारे पाठवण्यास सांगितले पैसे पोहोचण्याच्या आता पार्थला दाढ बुद्रुक (ता. राहाता) या ठिकाणी उतरून दिले.याप्रसंगी पार्थ हा हात जोडून विनंती करत असताही त्याला एसटीतून खाली उतरविण्यात आले. दाढ बुद्रुक गावात त्याचे कोणीच ओळखीचे नसल्यामुळे घाबरून तो रडत होता – सुनिता बाळासाहेब भुसाळ, पार्थ भुसाळची आई,उंबरी बाळापुर
- वाहक सौ.बलमे बँच नंबर १८७५७ यांची कामगिरी उद्या पासून बंद करण्यात येईल लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोमवारी नंतर महिला वाहका वर कडक कारवाई करण्यात येईल.परीवहन खात्याच्या नियमा अंतर्गत प्रवाशांनी सुट्टे पैसे ठेवणे आवश्यक आहे. वाहकाने सदर कारवाई नियमा अंतर्गत केली असावी अनेकदा एस टी चेक झाल्यावर टिकीट नसलेल्या प्रवाशावर दंडात्मक करवाई केली जाते. अशा प्रकरणात वाहकावर ही करवाई केल्या गेल्याचे अनेक प्रकरणे आहे. या प्रकरणा विषय बलमे यांची बाजु समजुन घेतल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल – प्रशांत गुंडएस टी डेपो मँनेजर,संगमनेर
