
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
राहाता – शिर्डी संस्थानमध्ये पहाटेच्या सुमारास कामावर जात असताना दोन कर्मचाऱ्यांची काल (दि.३) रोजी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी अचानकपणे हल्ला चढवून धारधार शस्त्रानं हत्या केल्याची घटना उघडकीस आली यामुळे संपूर्ण राहाता तालुक्यात एकच खळबळ उडाली होती संबंधित घटना घडल्या नंतर संबंधित मारेकरी हे शहराच्या परिसरातील काटेरी झुडपात लपून बसलेल्या अवस्थेत सापडले असून याच गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळन्यात पोलिसांना यश आले आहे.
राहाता तालुक्यातील साईबाबांची नगरीम्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीत भल्या पहाटे निष्पाप नागरिकांचे दुहेरी हत्याकांड करत दहशत माजवणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुस्का आवळल्या आहेत.यातील एक आरोपी किरण सदाफुलेला घटनेच्या काही तासातच पोलिसांच्या माध्यमातून शोध घेवून अटक करण्यात आली होती. तर दुसरा संशयित आरोपी राजू माळी उर्फ शाक्या याला आज संध्याकाळी अटक करण्यात पोलिसांना यश आले असून घटनेतील मुख्य आरोपी शाक्या उर्फ राजू माळी हा आरोपी गेल्या ३६ तासापासून शिर्डी पोलिसांना चकवा देत होता. त्यानंतर आज शिर्डी शहराच्या काटेरी झुडपात लपून बसलेला असताना त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं पकडल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलूबर्मे यांनी दिली.
या दोघांनी सोमवारी पहाटे साईसंस्थानमध्ये ड्युटीवर येणारे सुभाष घोडे आणि ड्युटीवरुन घरी जाणारे नितीन शेजूळ यांच्यावर धारदार शस्त्रांने वार करत त्यांची निघृण हत्या केली होती. तसेच कृष्णा देहरकर यांना देखील गंभीर जखमी केले होते. यामुळे सोमवार पासूनच शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पकडण्यात आलेल्या आरोपींनी दारुच्या नशेत लुट करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची प्राथमिक कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
