महाराष्ट्रशैक्षणिक

सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना यशोदीप शेटे यांच्याकडून “मेडिकल कोडींग” बद्दल मार्गदर्शन

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

अहिल्यानगर – भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी वेगळं आणि क्रांतिकारी बदल घडवण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयावर वायडी बाबा म्हणुन प्रसिद्ध असलेले यशोदीप शेटे यांनी एक भव्य मिशन हाती घेतलं आहे.त्यांनी ठरवलं आहे की देशातील प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत मेडिकल कोडींग हे करिअर क्षेत्र पोहोचवायचं आणि २ मे २०२९ पर्यंत १. ५ कोटी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवायचे आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या मिशनचा एक भाग म्हणून वायडी बाबा यांनी नुकतीच भेट दिली सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज (बी.एम.एस), संगमनेर या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन सत्र घेतलं आणि मेडिकल कोडींग म्हणजे काय,त्यामध्ये करिअर कसं घडवता येईल यावर सखोल चर्चा केली.

यावेळी मार्गदर्शन सत्रात वायडी बाबा यांनी खालील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला असून ते सर्व मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत मेडिकल कोडींग म्हणजे काय आणि त्याची उद्योगामध्ये गरज कशी वाढतेय वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या संधी मेडिकल कोडींग च्या माध्यमातून नोकरी व करिअरमध्ये मिळू शकणारा स्थैर्य आणि उच्च पगार भारत व परदेशात सर्टिफाइड मेडिकल कोडर्स ची वाढती मागणी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारे फायदे आदी बद्दल माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी हा सेशन अत्यंत उत्साहाने ऐकला आणि त्यांना एक नवीन दृष्टीकोन मिळाला. त्यांना समजलं की मेडिकल कोडींग हे एक भविष्य घडवणारं करिअर क्षेत्र आहे, जे आयुर्वेद,बीएएमएस, बीएचएमएस अशा पारंपरिक वैद्यकीय अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी देखील नवे दरवाजे उघडू शकतं.या विशेष उपक्रमाच्या निमित्ताने सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज च्या एचओडी डॉ. प्रज्ञा पतंगे यांच्या हस्ते यशोदीप शेटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना त्यांच्या ध्येयवादासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे.यशोदीप शेटे यांच्या या “मिशन मेडिकल कोडींग ” उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे विद्यार्थी फक्त शिक्षणापुरते मर्यादित न राहता जगभरातील करिअर संधी शोधायला प्रवृत्त होत आहेत.

वायडी बाबा यांचा संदेश आहे, “युथ एमपॉवरमेंट इज द रिअल रेवोलुशन” आणि ते हे प्रत्येक महाविद्यालयात मोफत मार्गदर्शन सत्र घेऊन सिद्ध करत आहेत.आजची विद्यार्थ्यांची पिढी वैद्यकीय क्षेत्रात केवळ डॉक्टर किंवा वैद्य बनण्यापुरती मर्यादित न राहता, मेडिकल कोडींग स्पेसिऍलिस्ट, हेअल्थकेअर,ऍनालिस्ट, मेडिकल बिलिंग एक्स्पर्ट अशा विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोफेशनल भूमिका पार पाडायला सज्ज होत आहे, आणि हे सर्व शक्य होत आहे फक्त यशोदीप शेटे यांच्या मार्गदर्शनामुळे.त्यांचा स्वप्नपूर्तीचा प्रवास फक्त सुरू झाला आहे. २०२९ पर्यंत १.५ कोटी विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्याचे ध्येय घेऊन, वायडी बाबा मोठ्या आत्मविश्वासाने आणि चिकाटीने आपल्या मिशनवर पुढे निघाले आहेत!

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!