अहिल्यानगर जिल्हा

प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींची हॉकीत विजयी भरारी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड  कोल्हापूर येथे पुणे विभागाचे करणार नेतृत्व करणार!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

लोणी – पुणे विभागीय शालेय हॉकी स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संघाचा ३-० गोलने पराभव करून विद्यालयाच्या संघाने राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी दिमाखात पात्रता मिळवली. या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.अशी माहीती प्राचार्या विद्याताई घोरपडे यांनी दिली.

 

चिखली, पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने उपांत्य फेरीत पुणे ग्रामीण संघाविरुद्ध ७-० गोलने एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर अंतिम सामन्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संघावर ३-० गोलने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.या दैदीप्यमान यशामुळे प्रवरा कन्या विद्या मंदिरचा संघ दि. २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे. विद्यालयासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

या विजयी संघामध्ये श्रावणी आमटे, सानिका बोंबळे, गोपी चिडे, तनिष्का मस्के, विद्या खाटीक, हर्षदा इथापे, केतूजा वटणे, दीक्षा वटणे, संस्कृती लोहागळे, पायल बोंबळे, समृद्धी काळे, कार्तिकी कुंदे, सानिका आगलावे, शिवानी काळुशे, पूनम बांगर, नक्षत्रा दहिवाले, कांचन इंगळे आणि उपासना गावडे या खेळाडूंचा समावेश आहे.या खेळाडूंना विद्यालयाच्या प्राचार्या विद्याताई घोरपडे, सौ. कल्पना कडू, कु. श्वेता पाटील तसेच फुटबॉल प्रशिक्षक कु. स्नेहल सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे आदींनी अभिनंदन केले आहे. 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!