
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
सात्रळ – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथे ‘२१ व्या शतकातील स्किल्स प्रोग्राम’ चे आयोजन महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट सेल, मॅजिक बस पुणे आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच इतरही कौशल्य विद्यार्थ्याने अवगत करणे अतिशय आवश्यक आहे. सभोवतालची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांसमोर नवनवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याचा सामना करायचा असेल तर विद्यार्थ्याला सर्व कौशल्य अंगीकारणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ नोकरी मिळवण्यासाठी विविध ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे, मुलाखतीची तयारी करणे गरजेचे आहे. मुलाखतीी पूर्वतयारी, स्वतः मधील सकारात्मक तसेच नकारात्मक गोष्टींची ओळख करून घेणे, नकारात्मक गोष्टींवर मात करून आयुष्यात पुढे कसे जावे, समाजाशी सुसंगत कसे वागावे? आपल्या आचरण समुदायांमध्ये कसे असावे ? कामाच्या ठिकाणी कसे वागावे ? या सर्व गोष्टी शिकविल्या गेल्या. स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामना करत असताना आपली सकारात्मकता कशी टिकवावी. बुद्धी कौशल्य कसे पणाला लावावे, व्यवहारांमध्ये आव्हानांशी जुळवून घेण्यास सक्षम असे ट्रेनिंग या सत्रात देण्यात आले. कार्पोरेट सेक्टर मध्ये काम करताना ज्या ज्या गोष्टींची गरज असते अशा सर्व गोष्टी या ट्रेनिंग मध्ये मुलांना प्रयत्नपूर्वक शिकविल्या गेल्या.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या समन्वयक प्रा. छाया कार्ले यांनी कार्यक्रमाचे अहवाल वाचन केले. ट्रेनिंग ऑफिसर, पुणे येथील प्रा. मनीषा अडागळे आणि प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सॉफ्ट स्किलचे धडे घेतले. ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी ट्रेनिंग प्लेसमेंटच्या सदस्या प्रा.स्वाती कडू यांनी आभार मानले.
