
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेतील कृषी महाविद्यालयातील तीन माजी विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीयकृत बँकेत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.दिलीप महाले यांनी दिली आहे.
या मध्ये आकाश डोंगरे याची कर्नाटका बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्क तसेच आईडीबीआई बँकेत कनिष्ठ सहायक व्यवस्थापक अशा तीन पदी तर सोनम जाधव हीची महाराष्ट्र बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर तसेच सेंट्रल बैंक ऑफ इंडिया मध्ये ग्राहक सेवा अधिकारी या दोन पदी निवड झाली आणि सायली चव्हाण हीची आईडीबीआई बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदावरती निवड झालेली आहे.महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्था विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी , कार्यानुभव उपक्रम इ. उपक्रमाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री भारत घोगरे,प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम , प्राचार्य प्रा.दिलीप महाले आदींनी अभिनंदन केले आहे.
