प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा कन्या विद्या मंदिरचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश राज्य गुणवत्ता यादीत मिळविले स्थान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील लोणी येथील प्रवरा कन्या विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी मंथन वेल्फेअर फाउंडेशनने आयोजित केलेल्या मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत यश संपादन केले अशी माहिती प्राचार्या सौ.भारती कुमकर यांनी दिली. 

 

 शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी आणि स्पर्धा परीक्षा विषयी उत्कंठा वाढावी या उद्देशाने या परीक्षा घेतल्या जातात. प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे उपक्रम ही मुलींसाठी सुरू असतात या माध्यमातून विद्यार्थिनींना वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळावी आणि त्यांना अभ्यासामध्ये आवड निर्माण होऊन त्यांना वेगवेगळ्या करिअरची माहिती ही शालेय शिक्षणातून मिळावी हा या मागचा उद्देश आहे असे प्राथमिक विभागाच्या मुख्याधपिका

 सौ. सीमा बढे यांनी सांगितले. प्राथमिक विभागातील राज्य गुणवत्ता यादीत शिवेंद्र महारुद्र तांबे इ.१ ली १५० पैकी १४२ गुण मिळवून ५ वा क्रमांक तर आयुषा गोरक्षनाथ आढळ इ.२ री १५० पैकी १४८गुण मिळवून २ रा क्रमांक , शिवाय सुरज कोकणे इ.२री याने १५० पैकी १४२ गुण मिळवून ५ वा क्रमांक मिळवला. तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत तन्वी अमित विलायते इ.१ ली हिने ५ वा, दुसरीच्या वर्गातील काव्या विवेक गिरी हिने २ रा, चैतन्य भास्कर धराडे याने २ रा, कृष्णा पोपट भोईटे याने ३ रा, मयुरेश सचिन खेतमाळीस याने ३ रा, दिवटे अयुरा बालाजी हिने ३ रा , तन्वी वेणूनाथ गागरे हिने ४ था क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सिमा बढे सौ. शितल आहेर, सौ.सिमा जगधने सिमा, सौ.अश्विनी तक्ते,प्रशांत अकोलकर , दिपाली रहाणे, सौ.वर्षा वराडे, प्रतिभा कर्पे, कोतकर स्वप्ना कोतकर, यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

 विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!