
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे गणेश परिसराचे भाग्यविधाते आहेत त्यांच्या आधाराने गणेश कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून शेतकरी,कामगार, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते स्व.शंकरराव कोल्हे आम्हाला सर्वांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांनी केले.
जळगाव -एलमवाडी (ता.राहाता) ग्रामस्थांच्या वतीने शनिवार (दि.२९) स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी व प्रेरणादिनानिमित्त येथील श्री.महादेव मंदिरात समस्त ग्रामस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यानंतर अभिवादन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,गणेश परिसराचा आता पूर्णपणे कायापालट झाला असून गणेश परिसराच्या जडणघडणीत सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हेंचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी होती स्व.कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य दिले त्यांच्या अभ्यासू वृत्तीमध्ये थोर विचारवंताचे नेतृत्व होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माजी आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू युवा नेतृत्व विवेक कोल्हे हे अतिशय उत्कृष्टपणे गणेश कारखान्याचे नेतृत्व सांभाळत आहे या गोष्टीचा आम्हाला सर्वांनाच अभिमान वाटतो असे संचालक संपतराव चौधरी यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते गंगाधर चौधरी,अण्णासाहेब चौधरी,गणेशचे संचालक संपतराव चौधरी,उपसरपंच दिलीप चौधरी,रंगनाथ चौधरी, एकनाथ चौधरी, सुरेश चौधरी,दत्तात्रय चौधरी,प्रकाश चौधरी,लहानू चौधरी,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी,बाबासाहेब चौधरी,गंगाधर साबदे,विनायक चौधरी,गोरख शिंदे,खंडू पगारे,राजेंद्र आदमने,मछिंद्र चौधरी,रंजक चौधरी,अंनत प्रभू वाणी,अप्पासाहेब चौधरी,नानासाहेब गुंजाळ,विक्रम साबदे, युवा उद्योजक महेंद्र चौधरी,विलास चौधरी,रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर आदीसह जळगाव-एलमवाडी परिसरातील कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.यावेळी युवा उद्योजक मेहेंद्र चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
