
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चितळी (ता.राहाता) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाठ पर्यवेक्षिका अनिता सातव यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गणेश सहकारी कारखान्याचे संचालक मधुकरराव सातव, चितळी डिस्टीलरीचे असिस्टंट मॅनेजर सुधाकरराव सातव, शिक्षक मंगलसिंग वसावे,अमोलअरगडे, संजय रहाणे,अरुण रूपवते,किशोर लंगोटे,संदीप कलांगडे, योगेश ताके क्रीडा शिक्षक अरुण झुराळे,कैलास वाघ,रमेश दहिफळे,प्रफुल्ल धनवटे, रमेश हिवाळे,श्रीमती खरात,निर्मळ ए.एल, श्रीमती शिंदे आर.आर,श्रीमती वाघमारे एस. बी,लबडे एस.जी,श्रीमती भुजबळ एन.एस,श्रीमती पाटील एस.एस आदी सह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
