शैक्षणिक

खानापूर येथील शेतमजुर कुटुंबातील राहुल गाढे सीए परीक्षेत ऊत्तीर्ण;सर्वस्थरातुन कौतुक

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – तालुक्यातील खानापूर येथील शेतमजुर कुटुंबातील राहुल अशोक गाढे हा विद्यार्थी सीए परिक्षा ऊत्तीर्ण झाला आहे.

खानापूर गावात पहिला सीए झालेल्या राहुल चे वडील अशोक चंद्रभान गाढे व चुलते शिवाजी चंद्रभान गाढे हे खानापूर शिवारातील प्रा. बबनरांव आदिक यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काबाड कष्ट करतात. विशेष म्हणजे सी ए पर्यत शिक्षण पूर्ण करण्यासाठी राहूल व कुटुंबियास प्रा.आदिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राहुलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण जानकिबाई आदिक विद्यालयात व महाविद्यालयीन पदवी पर्यतचे शिक्षण चंद्ररूप डाकले कॉमर्स महाविद्यालयात झाले.

 

पुणे येथे सीए अभ्यासक्रमात महेंद्र भोसले,अजित जोशी शैलेश वाघ यांची मोलाची मदत झाली. सी ए परिक्षा ऊत्तीर्ण होऊन खानापूर गावात पहिला बहुमान मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अविनाश आदिक ,माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अशोकचे व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक सरपंच ज्ञानदेव आदिक ,सोसायटीचे चेअरमन निलेश आदिक,माजी चेअरमन नामदेव आदिक,कचरू भानुदास आदिक, माजी सरपंच दत्तात्रय आदिक ,ताबाळासाहेब आदिक,अनिल गो.जोशी,रमेश गो.जोशी, कारभारी वाकडे,सेवानिवॄत्त पोस्ट मास्तर परसराम गाढे,गोरख गाढे यांनी अभिनंदन केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!