आरोग्यसामाजिक

प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावात निश्चय शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – जळगाव (ता.राहाता) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र,जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने महादेव मंदिरात मंगळवारी (दि.१८) रोजी ‘निश्चय’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते गंगाधर चौधरी गणेशचे संचालक संपतराव चौधरी अण्णासाहेब चौधरी महेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, बाबासाहेब चौधरी,विजय चौधरी,लहानु चौधरी आदीसह जळगावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

जळगाव परिसरामधील ज्या ही नागरिकांना ब्लडप्रेशर शुगरचा त्रास आहे त्यांची तपासणी करण्यात आली ६० वर्षावरील टीबी ग्रस्त किंवा टीबीचे लक्षणे असणाऱ्या नागरिकांची यावेळी शुगर, थुंकीचे नमुने संकलित करण्यात येऊन त्यांची  तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ.राजू शिंदे आरोग्य सेवक रविंद्र काळे,आरोग्य सेविका श्रीमती दिवे, यांनी टी.बी आजारा विषयी माहिती देवून मार्गदर्शन केले. आयोजित शिबिरामध्ये जळगाव परिसरातील ८० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती डॉ.राजू शिंदे यांनी दिली. यावेळी आशा सेविका सविता कापरे, मिरा कापरे, मनिषा शिनगारे, रुपाली गाढवे, स्वाती बोरावके यांनी तपासणी शिबिरासाठी सहकार्य केले.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!