(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
राहाता: (ता.२६) – राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान आणि समस्त दाढ बुद्रुक ग्रामस्थ आयोजित श्री साई सच्चरित पारायण व सन्मान नारिशक्तीचा महिला किर्तन महोत्सव सोहळा बुधवार दि. २५ डिसेंबर पासुन झाला.
या महिला किर्तन महोत्सवामध्ये सकाळी ७.००वाजता श्री.साई सच्चरित पारायणाचे साईभक्त श्री सोपान मांढरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने वाचन तसेच संध्याकाळी ७:००ते ९:०० वाजता ह. भ. प. रेखाताई काकड (निर्हाळे) यांच्या सुमधुर वाणीने किर्तनाने सुरुवात झाली असुन कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २५ डिसेंबर पासून सोहळ्याला सुरुवात झाली असुन भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे बुधवार दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी स्वर भास्कर ह. भ. प. बाळासाहेब रंजाळे महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असुन सदर प्रसंगी जलसंपदा ना. राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ,सामाजिक ,राजकिय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना श्री साईरत्न पुरस्कार व विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे त्यानंतर महाप्रसादाचे सांगता होणार आहे अशी माहिती श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान दाढ बु चे अध्यक्ष श्री योगेश तांबे पाटील, उपाध्यक्ष रविद्र वाणी आणि सरपंच तात्यासाहेब सातपुते यांनी दिली. कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दाढ बुद्रुक येथील श्रद्धा ग्रामविकास विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील १५ वर्षापासून हा उपक्रम लोकसहभागातून सुरू आहे. आध्यात्मिक कार्याबरोबरच साई श्री.साई सच्चरित पारायणाच्या माध्यमातून हजारो भाविकांना एकत्रित करण्याचे काम श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जातात याशिवाय जिल्ह्यातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा ही सन्मान साई रत्न पुरस्कार देऊन केला जातो यामध्ये दाढ परिसरातील युवकांचा आणि सर्व धर्मीय समाज बांधवांचे योगदान हे मोठे असते.
